Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातचे 32 बेनामी बँक व्यवहार उघड; मोठ्या पतसंस्थेचा मॅनेजर गजाआड

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातचे 32 बेनामी बँक व्यवहार उघड; मोठ्या पतसंस्थेचा मॅनेजर गजाआड

Ashok Kharat Case: भोंदूगिरी आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांनी हादरलेल्या अशोक खरात प्रकरणात आता एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा स्फोट झाला आहे. खरातने फसवणुकीतून कमावलेली कोट्यवधींची ‘माया’ पचवण्यासाठी बँकिंग यंत्रणेचा वापर केल्याचे समोर आले असून, या कटात साथ देणाऱ्या सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे या रॅकेटचे धागेदोरे थेट बँकिंग क्षेत्रापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

बनावट खात्यांचा सुळसुळाट
तपासादरम्यान विशेष तपास पथकाला (SIT) धक्कादायक माहिती मिळाली आहे. खरातने आपले काळे पैसे पांढरे करण्यासाठी सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेची निवड केली होती. खरातशी संबंधित तब्बल ३२ संशयास्पद खाती या पतसंस्थेत आढळली आहेत. ही सर्व खाती बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आली होती. या खात्यांमधून गेल्या काही काळात कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले असून, ही रक्कम फसवणुकीच्या माध्यमातून जमा झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

मॅनेजर कांडेकर पोलिसांच्या जाळ्यात
पतसंस्थेचे सर्व नियम धाब्यावर बसवून खरातला या बेकायदेशीर व्यवहारांसाठी मदत केल्याचा ठपका व्यवस्थापक अविनाश कांडेकर याच्यावर ठेवण्यात आला आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांना कायदेशीर कवच मिळवून देण्यात कांडेकरची भूमिका कळीची ठरली. सिन्नर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

SIT चा तपास आता ‘मास्टरमाइंड’च्या शोधात
या ३२ खात्यांमधील पैशांचा हिशोब लागल्यास या प्रकरणातील अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. या अटकेमुळे खरातच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली असून, आगामी काळात या आर्थिक रॅकेटचे आणखी धक्कादायक पदर उलगडले जाण्याची चिन्हे आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!