Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पोस्ट ऑफिस की बँक FD? जाणून घ्या तुमचे पैसे कुठं राहतील Safe…

पोस्ट ऑफिस की बँक FD? जाणून घ्या तुमचे पैसे कुठं राहतील Safe…

नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण बचत अर्थात सेव्हिंग करत असतील. पण हीच सेव्हिंग करताना लहान गुंतवणूकदारांसाठी पैसे सुरक्षित राहणे ही काळजी असते. आपले कष्टाचे पैसे कुठे गुंतवावेत, जेणेकरून पैसे गमावण्याच्या भीतीशिवाय त्यांना भरघोस परतावा मिळू शकेल, यासाठी अनेक पर्यायांकडे लक्ष दिले जाते.

सुरक्षेच्या बाबतीत पोस्ट ऑफिस आणि बँक दोन्हीही खूप सुरक्षित मानले जातात, कारण सरकार स्वतः हमी देते. शिवाय, परताव्याचीही हमी दिलेली असते. पीपीएफ (PPF), एनएससी (NSC) आणि एमआयएस (MIS) यांसारख्या पोस्ट ऑफिस बचत योजनांना भारत सरकारची सार्वभौम हमी असते. याचा अर्थ असा की, तुम्ही त्यात जमा केलेल्या पैशांची जबाबदारी सरकार स्वतः घेते. यामध्ये मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट असतात, ज्यामुळे ते १००% जोखीममुक्त होते.

पोस्ट ऑफिस हे एकप्रकारचे सरकारचा भाग आहे, त्यामुळे दिवाळखोरीचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही १ लाख रुपये जमा करा किंवा १ कोटी रुपये, तुमची संपूर्ण रक्कम परत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. ज्यांना ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम कोणत्याही टेन्शनशिवाय एकाच ठिकाणी ठेवायची आहे, त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम आहे.

बँक एफडी करावी का?

एसबीआय असो वा एचडीएफसी, एका बँकेत जमा केलेले तुमचे पैसे आरबीआयचा एक भाग असलेल्या डीआयसीजीसी (डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) द्वारे संरक्षित असतात. जास्तीत जास्त ५ लाख रुपये पूर्णपणे सुरक्षित आणि विमा संरक्षित असतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!