Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Food Poisoning: आधी बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Food Poisoning: आधी बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Food Poisoning: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर झालेल्या भीषण विषबाधेमुळे (Food Poisoning) एकाच कुटुंबातील चार जणांचा करुण अंत झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असून, या घटनेमुळे मुघल बिल्डिंग परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पायधुनीच्या घाटी गल्लीतील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबाने शनिवारी रात्री इतर नातेवाईकांसोबत जेवण केले. जेवणात आधी बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाण्यात आले होते. मात्र, त्यानंतर रविवारी सकाळी कुटुंबातील सदस्यांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेतल्यानंतर प्रकृती अधिक बिघडल्याने सर्वांना तात्काळ जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान एकापाठोपाठ एक अशा चौघांचाही मृत्यू झाला.

  • मृतांची ओळख:
    अब्दुल्ला डोकाडिया (४० वर्षे)
  • नसरीन डोकाडिया (३५ वर्षे)
  • आयशा डोकाडिया (१६ वर्षे)
  • झैनब डोकाडिया (१३ वर्षे)

रहस्य अद्याप कायम
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही विषबाधा जेवणातून झाली असावी असा संशय आहे. “बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने प्रकृती बिघडली,” असा जबाब एका पीडिताने मृत्यूआधी दिला होता. मात्र, केवळ कलिंगड आणि बिर्याणीच्या सेवनाने एकाच वेळी चौघांचा मृत्यू कसा झाला, याबाबत गूढ कायम आहे. पायधुनी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. “शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि तांत्रिक कारण स्पष्ट होईल,” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!