Today मंगळवार, 28th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

KEM Hospital : केईएम रुग्णालयात संतापाचा उद्रेक! परिचारिका आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण; कर्मचाऱ्यांचा डीन कार्यालयाबाहेर गोंधळ

KEM Hospital : केईएम रुग्णालयात संतापाचा उद्रेक! परिचारिका आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण; कर्मचाऱ्यांचा डीन कार्यालयाबाहेर गोंधळ

KEM Hospital : परळ येथील पालिकेच्या केईएम रुग्णालयात आज सकाळी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून मृताच्या नातेवाईकांनी कर्तव्यावर असलेल्या परिचारिका (नर्स) आणि सुरक्षा रक्षकावर हिंसक हल्ला चढवला. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचारी कमालीचे संतप्त झाले असून त्यांनी कामावर बहिष्कार टाकत अधिष्ठातांच्या (डीन) कार्यालयाला घेराव घातला.

नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा राग नातेवाईकांनी तिथे उपस्थित असलेल्या परिचारिकेवर काढला. नातेवाईकांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी नर्सेसच्या मदतीला धावून आलेल्या सुरक्षा रक्षकालाही नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. या अनपेक्षित हल्ल्यात नर्स आणि सुरक्षा रक्षक दोघेही जखमी झाले आहेत.

कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा
आपल्या सहकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच केईएममधील सर्व परिचारिका आणि कर्मचारी एकत्र जमले. कर्मचाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिष्ठातांना जाब विचारला. घटनेला वेळ उलटूनही अद्याप हल्लेखोरांवर गुन्हा (FIR) का दाखल झाला नाही? वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून कर्मचाऱ्यांना सुरक्षा कधी मिळणार? जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत काम न करण्याची भूमिका काही कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

पोलीस कारवाई आणि सद्यस्थिती
केईएम रुग्णालयात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस सध्या वॉर्डमधील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा मुंबईतील रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!