पुणे : पोलिस दलात नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ठाणे पोलिस दलात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ठाणे पोलिस दलात विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत तीन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2026 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला २५००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी पोलीस आयुक्त, ठाणे, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे पिन नं. 4600601 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.thanepolice.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विधी अधिकारी- गट ब, विधी अधिकारी.
– रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : ठाणे
– वेतन / मानधन: रु. २०,०००/- रु. २५०००/- आणि दूरध्वनी व प्रवास खर्च: रु. ३,०००/-. दरमहा.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2026.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, ठाणे, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे पिन नं. 4600601.


