मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक असे कपल्स आहेत त्यांची चर्चा अजूनही होते. त्यापैकी एक म्हणजे बिपाशा बसू. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर त्यांच्या लग्नाचा १० वा वाढदिवस गुरुवारी झाला. या खास प्रसंगी, बिपाशाने इन्स्टाग्रामवर अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिपाशा, करण आणि त्यांची मुलगी देवी खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहेत.
बिपाशा बसूने तिचा पती करण सिंग ग्रोव्हर आणि त्यांची मुलगी देवी यांच्यासोबतचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या गोड आणि सुंदर फोटोंसोबतच, बिपाशाने तिचा पती करणचे कौतुक करत लिहिले आहे की, करण हा सर्वात प्रेमळ पती आहे आणि ती, तिची मुलगी देवीसोबत, जगातील सर्वात भाग्यवान मुली आहेत. तिने त्यांच्या १० वर्षांच्या वैवाहिक जीवनातील अनेक आठवणी शेअर केल्या आहेत, ज्यात त्यांच्या लग्नाच्या दिवसाचे, सुट्ट्यांचे आणि त्यांची मुलगी देवीच्या जन्मानंतरच्या आनंदाच्या क्षणांचे फोटो आहेत.
बिपाशाने करणबद्दल लिहिले, “सर्वात गोड व्यक्तीसोबत आनंदाची १० वर्षे. मला कशाची सर्वात जास्त गरज आहे हे देवाला माहीत होते. माझे आयुष्य प्रेम आणि साधेपणाने भरलेले आहे. छोटे क्षण आणि छोटे आनंद. तू दररोज आमचे आयुष्य या आनंदाने भरतोस.” आमच्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद. बिपाशाने पुढे लिहिले, ‘मी आणि देवी जगातील सर्वात भाग्यवान मुली आहोत. १० व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.’


