Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; आळंदीत कीर्तनकार संग्राम भंडारेंकडून हल्ल्याचा प्रयत्न

Pune News: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; आळंदीत कीर्तनकार संग्राम भंडारेंकडून हल्ल्याचा प्रयत्न

Pune News: वारकरी संप्रदायातील अंतर्गत वादातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या सुमारे १० ते १५ समर्थकांनी आळंदी परिसरात लवांडे यांची गाडी अडवून हा प्रकार केला. या हल्ल्यानंतर लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर अटकेची कारवाई होईपर्यंत सत्याग्रह करण्याचा पवित्रा घेतला आहे.

नेमका घटनाक्रम काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विकास लवांडे हे आळंदी येथे एका दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी आले होते. प्रवचन संपवून ते पुण्याकडे परतत असताना, निर्जन स्थळी दोन-तीन गाड्यांमधून आलेल्या टोळीने त्यांचा रस्ता अडवला. हल्लेखोरांनी लवांडे यांना गाडीतून ओढून बाहेर काढले आणि त्यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या रिकाम्या केल्या. विकास लवांडे यांनी आरोप केला आहे की, या जमावातील दोन जणांकडे बंदुका होत्या आणि त्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आजूबाजूला लोक जमा होऊ लागताच हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

‘वारकरी विरुद्ध मनुवादी’ संघर्ष
गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायामध्ये ‘कट्टर हिंदुत्ववादी’ आणि ‘धारकरी’ विचारांच्या लोकांनी शिरकाव केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून केला जात आहे. संप्रदाय ‘हायजॅक’ करणाऱ्या ४० कथित घुसखोर महंतांची नावे जाहीर करण्याचा इशारा शरद पवारांनी दिला होता. विकास लवांडे यांनी सातत्याने वारकरी चळवळीतील ‘मनुवादी घुसखोरी’वर पुराव्यांसह भाष्य केले होते. याच रागातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

रोहित पवारांचा सरकारवर प्रहार
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्ञानोबा-तुकोबांना ज्या मनुवादी वृत्तीने छळले होते, त्याच वृत्तीचे लोक आज लवांडेंवर हल्ले करत आहेत. सरकारने तात्काळ आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात आणि लवांडे यांना पोलीस संरक्षण द्यावे. अन्यथा, हा हल्ला सत्तेच्या आशीर्वादाने झाला आहे असे आम्ही समजू, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पुढील पाऊल
विकास लवांडे सध्या पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून असून, संग्राम भंडारे व त्यांच्या साथीदारांना अटक होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!