Popat Deshmukh Death : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना मोठा धक्का बसला असून त्यांचे वडील पोपट गणपतराव देशमुख (वय ६९) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते दिवंगत विक्रमी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते.
पोपट देशमुख हे मूळचे मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील रहिवासी होते. राजकीय वारसा असतानाही त्यांनी कधीही सक्रिय राजकारणात सहभाग न घेता साधेपणाने सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्यांना मोठा सन्मान होता.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या राजकीय प्रवासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते. त्यांच्या निधनामुळे देशमुख कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी ९ वाजता पेनूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


