Maharashtra Heatwave : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्येही तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
मुंबईत राम मंदिर परिसरात 39.7 अंश, विक्रोळीत 38.5 अंश, वांद्र्यात 37.3 अंश तर सांताक्रुजमध्ये 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शहरात तापमान चाळीशीच्या जवळ पोहोचल्याने उष्णतेचा त्रास वाढला आहे.
राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांमधील तापमान
छत्रपती संभाजीनगर – 43.4
मालेगांव – 43.2
सतारा – 41.1
जळगाव – 44.3
रत्नागिरी – 34
नाशिक – 42
नवी मुंबई – 39.2
बारामती – 41.2
कुलाबा – 35.4
पुणे – 41.6
अलीबाग – 38.2
बीड – 43.5
नंदुरबार – 45.3
सोलापूर – 42.3
परभणी – 43.2
मुंबई – 35.8
माथेरान – 36.6
अहिल्यानगर – 42.2
अकोला – 45.1
अमरावती – 44
भंडारा – 42
बुलढाणा – 43.2
ब्रह्मपुरी – 42.2
चंद्रपुर – 41
नागपुर – 42
वर्धा – 43.8
वाशिम – 42.6
यवतमाळ- 41.4
कोकण भागात तुलनेने कमी तापमान नोंदवले गेले असून रत्नागिरीत 34 आणि कुलाब्यात 35.4 तापमान आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होत आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी, वाघी धानोरा आणि शेवडी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने पुढील काळात पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


