Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप; पटेल, तटकरे, भुजबळांना कार्यकारिणीतून डच्चू?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप; पटेल, तटकरे, भुजबळांना कार्यकारिणीतून डच्चू?

Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या यादीत पक्षातील अनेक ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्याचं दिसून येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या या यादीतून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांनाही कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी आणि बदलांची चर्चा सुरू झाली आहे.

या यादीवर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी ही तांत्रिक चूक असल्याचं सांगितलं असून लवकरच ती दुरुस्त केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, नव्या यादीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची सरचिटणीसपदी तर जय पवार यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून जुन्या आणि अनुभवी नेत्यांना वगळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!