Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Politics : विदर्भातील काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे चित्र दर्यापूर तालुक्यात दिसून आले आहे. स्थानिक काँग्रेस नेते सुधाकर भारसाकळे यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दर्यापूर तालुक्यातील काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि वाढत्या मतभेदांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अंतर्गत नाराजीमुळे राजीनामा?

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा काँग्रेसमधील सततच्या गटबाजीवर नाराज होऊन सुधाकर भारसाकळे यांनी पद सोडले आहे. त्यांनी खासदार बळवंत वानखेडे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली असल्याचे समोर आले आहे.

नगरपरिषद निवडणुकीनंतर वाढला वाद

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीवरून मतभेद निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. काही उमेदवारांची तिकिटे ऐनवेळी रद्द करण्यात आली, तसेच स्थानिक नेत्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचेही ते म्हणाले. याशिवाय अल्पसंख्याक सेलच्या नियुक्त्यांबाबतही कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राजकीय वजन असलेले नेते

सुधाकर भारसाकळे हे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. ते भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांचे बंधू असल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेससाठी मोठा धक्का

दर्यापूर तालुक्यात काँग्रेसचे मजबूत संघटन असून अनेक सहकारी संस्था पक्षाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या राजीनाम्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!