Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vikas Lawande Arrest: मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक

Vikas Lawande Arrest: मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक

Vikas Lawande Arrest: पुण्यात राजकीय वातावरण तापवणारी मोठी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.

वादग्रस्त वक्तव्य आणि वाढता संघर्ष

काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले होते. वारकरी समाजात काही ‘घुसखोर’ असल्याचा आणि द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप करत लवांडे यांनी काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांनी काही कीर्तनकारांबाबत यादीही जाहीर केल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर वातावरण अधिक तणावपूर्ण बनले होते.

आधी शाईफेक, आता अटकेची कारवाई

या प्रकरणातून निर्माण झालेल्या वादानंतर काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शाईफेक झाल्याची घटनाही घडली होती. त्यानंतर वाघोली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता त्याच प्रकरणात पोलिसांनी थेट अटकेची कारवाई केल्याची माहिती पुढे आली आहे.

पक्षाकडून खोट्या गुन्ह्याचा आरोप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून या कारवाईवर आक्षेप घेण्यात आला आहे. पक्षाच्या नेत्यांनी लवांडे यांना खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आल्याचा दावा केला आहे. या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांचे आवाहन आणि वाढता तणाव

या घटनेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाघोली पोलीस ठाण्याच्या परिसरात जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडूनही बंदोबस्त वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

अटकेमागचे अधिकृत कारण अद्याप अस्पष्ट

सध्या तरी पोलिसांकडून याबाबत अधिकृत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. अटकेमागील नेमकी कारणे स्पष्ट झालेली नसल्याने या प्रकरणाभोवती संभ्रम आणि राजकीय तणाव दोन्ही कायम आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!