Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pravin Tarde : ‘देऊळ बंद 2’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा

Pravin Tarde : ‘देऊळ बंद 2’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा

Pravin Tarde : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे सध्या ‘देऊळ बंद 2’च्या यशामुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने 32 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचे सांगितले जात आहे. अशातच प्रवीण तरडे यांनी चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा करत आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

‘देऊळ बंद 2’च्या प्रमोशनदरम्यान प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे विविध चित्रपटगृहांना भेट देत प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. एका मुलाखतीत बोलताना प्रवीण तरडे यांनी ‘देऊळ बंद 2’नंतर आपला पुढील चित्रपट ‘मुळशी पॅटर्न 2’ असणार असल्याचे स्पष्ट केले.

‘मुळशी पॅटर्न’मधून शेतजमिनीचे महत्त्व अधोरेखित केल्यानंतर आता ‘मुळशी पॅटर्न 2’मध्ये सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नामागील वास्तव उलगडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “आपल्या घराचे स्वप्न इतके महाग का झाले? याचे उत्तर या चित्रपटातून मिळेल,” असेही त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे या चित्रपटाचे नाव ‘मुळशी पॅटर्न 2 तुमच्या घरातल्या भिंतीतील वाळूची गोष्ट’ असे असणार असल्याचे प्रवीण तरडे यांनी जाहीर केले. हा चित्रपट अत्यंत वेगळ्या आणि धक्कादायक विषयावर आधारित असेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. त्यामुळे आता ‘मुळशी पॅटर्न 2’बाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!