Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुनीताने गोविंदाला इम्प्रेस करण्यासाठी वयाच्या 15 व्या वर्षीच केलं असं काही की नंतर…

सुनीताने गोविंदाला इम्प्रेस करण्यासाठी वयाच्या 15 व्या वर्षीच केलं असं काही की नंतर…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा नेहमीच चर्चेत असते आणि अनेकदा तिच्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या गोष्टी सांगत असते. नुकतेच, तिने तिची मुलगी टीनाच्या शोमध्ये खुलासा केला की, तिने गोविंदाला इम्प्रेस करण्यासाठी वयाच्या १५ व्या वर्षी स्वयंपाक करायला शिकले.

सुनीताने ‘माँ है ना’ या शोमध्ये तिची मुलगी टीना आहुजासोबत तिच्या वैवाहिक जीवनावर चर्चा केली. सुनीताला विचारण्यात आले की, तिला स्वयंपाक करायला आवडतो का? गोविंदासोबतच्या तिच्या नात्यात अन्नाच्या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली, मी स्वयंपाक करून माझ्या पतीला जिंकते. खूप लहान वयात स्वयंपाक करायला सुरुवात केली. कारण गोविंदाला खाण्याची खूप आवड होती. माझं लग्न लवकर झालं आणि माझ्या पतीला खायला खूप आवडायचं. तिने तिच्या भावी पतीला इम्प्रेस करण्यासाठी वयाच्या १५ व्या वर्षी स्वयंपाक करायला शिकले.

गोविंदा आणि सुनिता आहुजा हे बॉलिवूडमधील सर्वात जास्त काळ टिकलेल्या जोडप्यांपैकी एक मानले जातात. वृत्तानुसार, ते तरुणपणात एका कौटुंबिक नात्यामुळे भेटले आणि अखेरीस त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. जेव्हा त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, तेव्हा गोविंदा सुमारे २१ वर्षांचा होता, तर सुनिता फक्त १५ वर्षांची होती. गोविंदा बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक बनण्यापूर्वीच, या जोडप्याने मार्च १९८७ मध्ये गुपचूप लग्न केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!