Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षी दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्रातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. तसेच यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची जोरदार अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपी करण्याच्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. तसेच यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटला आहे. त्यामुळे दहावीचा निकाल वाढणार की घटणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे पालकांचे लक्ष लागले आहे.

कधी आणि कसा पाहणार निकाल?

दुपारी एक वाजल्यापासून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर लॉगिन करून आपला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, results.targetpublications.org आणि sscresult.mkcl.org या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे. या वेबसाईटवर निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे. ऑनलाईन मार्कशीटमध्ये विषयवार गुण, जन्मतारीख आणि परीक्षा क्रमांकाचा र समाविष्ट असेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!