Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Breaking News : चऱ्होलीची प्रस्तावित टीपी स्कीम अखेर रद्द! भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय, प्रशासनाने प्रक्रिया थांबवली

Breaking News : चऱ्होलीची प्रस्तावित टीपी स्कीम अखेर रद्द! भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय, प्रशासनाने प्रक्रिया थांबवली

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली टीपी स्कीम अखेर रद्द करण्यात आली आहे. प्रशाससनाने आज (दि. २९) याबाबत घोषणा केली. आगामी सर्वसाधारण सभेत त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन ‘नोटिफिफकेशन’ काढण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांच्या एकजुटीचा विजय झाला असून, भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश मिळले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासनाने मौजे चिखली आणि चऱ्होलीसह शहरातील काही गावांमध्ये टीपी स्कीम राबवण्याची योजना आखली होती. स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांना विश्वासात न घेता ही स्कीम लादण्याचा प्रयत्न सुरू होता. या टीपी स्कीमला तीव्र विरोध करण्यात आला.

दरम्यान, भाजपा आमदार महेश लांडगे यांनी भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी या टीपी स्कीमच्या विरोधात रान पेटवले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या. शहराच्या स्थापनेपासून भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे. सुरूवातीला एमआयडीसी, त्यानंतर नवनगर प्राधिकरण आणि महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतरही विविध आरक्षणांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत. आता टीपी स्कीमच्या माध्यातून शेतकरी भूमिहीन होतील. त्यामुळे आमचा टीपी स्कीमला तीव्र विरोध आहे. तसेच, संपूर्ण शहराचा सुधारित विकास आराखडा (DP) तयार होत असताना ती स्कीमचा आग्रह कशासाठी? असा प्रश्नही आमदार लांडगे यांनी उपस्थित केला होता.

भूमिपुत्रांची एकजुट आणि आमदार महेश लांडगे यांची साथ यामुळे मौजे चिखली येथील टीपी स्कीम रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. त्यानंतर मौजे चऱ्होलीची टीपी स्कीम रद्द करण्यासाठी महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांची बैठक झाली आणि शुक्रवारी, 30 मे रोजी चऱ्होली बंदची हाक दिली होती. माजी महापौर नितीन काळजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांच्यासह ग्रामस्थांनी वज्रमुठ बांधली होती. विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपुत्रांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल, अशी मागणीही केली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नमते घेतले आणि चऱ्होलीची टीपी स्कीम रद्द केली.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मौजे चऱ्होली येथील प्रस्तावित टीपी स्कीम सुरू केलेल्या प्रक्रियेला स्थगिती दिली. भूमिपुत्रांनी सदर टीपी स्कीमला विरोध केला आहे. त्यामुळे प्रक्रिया स्थगित करीत आहोत. तसेच, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन टीपी स्कीम रद्दच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे शेखर सिंह यांनी सांगितले.

माझ्या गेल्या 20 वर्षांतील सामाजिक व राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू म्हणून पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्र राहीला आहे. त्यामुळे भूमिपुत्रांच्या हिताबाबत कोणतीही तडजोड नाही, अशीच माझी भूमिका आहे. चिखली आणि चऱ्होली दोन्ही गावातील टीपी स्कीम रद्द झाली. तसे नोटिफिशेन लवकरच काढण्यात येईल. महानगरपालिका प्रशासनाचे मनापासून आभार मानतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पाठबळ दिले. शास्तीकर सरसकट माफी असो, प्राधिकरण परतावा आणि बफर झोन रद्द करण्यासारखे निर्णय भाजपा महायुती सरकारने घेतले. या पुढील काळातही भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी कायम आग्रही राहणार आहे.
-महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!