Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वाहन बेदरकारपणे चालवून मृत्यू झाल्यास विमा कंपनी भरपाईस उत्तरदायी नाही: सुप्रीम कोर्ट

वाहन बेदरकारपणे चालवून मृत्यू झाल्यास विमा कंपनी भरपाईस उत्तरदायी नाही: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देण्यास विमा कंपन्या उत्तरदायी नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. सुसाट गाडी चालवताना मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाकडून भरपाईचा दावा करण्यात आला होता.

न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने मृत व्यक्तीच्या कुटुंबाकडून करण्यात आलेली ८० लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी अमान्य केली. या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने गतवर्षी २३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास खंडपीठाने नकार दिला. उच्च न्यायालयाने मृताच्या कायदेशीर उत्तराधिकाऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे संबंधित कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानेदेखील ही याचिका फेटाळून लावली.

या प्रकरणानुसार १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश नामक व्यक्तीचा प्रवासादरम्यान कार उलटल्याने मृत्यू झाला होता. परंतु संबंधित प्रकरणात वाहतूक नियमांचे उल्लंघन करत निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे कार चालवण्यात आल्याचे आढळून आले. दुर्घटना रवीशच्या निष्काळजीपणामुळे घडली. त्यामुळे त्याचे कायदेशीर उत्तराधिकारी कुठल्याही प्रकाराच्या भरपाईचा दावा करू शकत नाहीत. असे करणे म्हणजे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या चुकीच्या गोष्टीसाठी भरपाई देण्यासारखे होईल, असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!