Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वहिनीसोबत अनैतिक संबंध; सख्ख्या भावाचा काढला काटा ! चऱ्होली येथील धक्कदायक घटना; भावासह पत्नीला अटक

वहिनीसोबत अनैतिक संबंध; सख्ख्या भावाचा काढला काटा ! चऱ्होली येथील धक्कदायक घटना; भावासह पत्नीला अटक

पिंपरी: वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाला अडसर ठरत असलेल्या भावाचा त्याच्या पत्नीसोबत मिळून सख्ख्या भावाने काटा काढला. चऱ्होली येथे पठारेमळा परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपी भावासह पत्नीला बेड्या ठोकल्या.

धनु दादा लकडे (वय ३३, रा. काळे कॉलनी, चऱ्होली) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. या प्रकरणी लहान भाऊ सोमनाथ दादा लकडे (वय १९) व पत्नी शितल धनु लकडे (वय २५, दोघे रा.चऱ्होली) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सकाळी साडे अकाराच्या सुमारास धनु लकडे याचा मृतदेह पठारेमळा चऱ्होली येथे मिळाला, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्याचा धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून खून केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार खंडणी विरोधी पथक तसेच गुंडा विरोधी पथकाने समांतर तपास सुरु केला.

दरम्यान अधिक तपास करत असताना यातील फिर्यादी व मृत धनु लकडे याचा सख्खा भाऊ सोमनाथ लकडे आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता शितल लकडे हिच्या बरोबर अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. तसेच भाऊ अनैतिक संबंधाला अडचण ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शितल लकडे हिला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक आणि खंडणी विरोधी पथकाने केली. पुढील तपास दिघी पोलीस करत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!