Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नाशिक जिल्हा परिषदेच्या 662 शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली; प्रक्रियेला यंदा उशीर, मालेगावमधून सर्वाधिक १०३ शिक्षक

नाशिक जिल्हा परिषदेच्या 662 शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली; प्रक्रियेला यंदा उशीर, मालेगावमधून सर्वाधिक १०३ शिक्षक

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू असून, संवर्ग एक अंतर्गत ६६२ शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक १०३ शिक्षकांचा समावेश आहे. संवर्ग दोन अंतर्गत पात्र शिक्षकांना आता ‘प्राधान्य अर्ज’ भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील ३,२६३ प्राथमिक शाळांमध्ये सुमारे १० हजार शिक्षक कार्यरत आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत असले तरी यंदा बदली प्रक्रिया उशिरा सुरू आहे. मे महिन्यात पूर्ण होणारी ही प्रक्रिया शाळा सुरू झाल्यावरही सुरू आहे. संवर्ग एकमधील २,४६४ शिक्षकांपैकी ६६२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, यात दिव्यांग, ५३ वर्षांवरील, गंभीर आजार (कर्करोग, हृदय शस्त्रक्रिया, यकृत प्रत्यारोपण, थैलेसेमिया इ.) असलेले शिक्षक, तसेच विधवा, कुमारिका, परित्यक्ता आणि स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज यांचा समावेश आहे.

शिक्षकांनी शुक्रवार (दि. ११) पासून ऑनलाइन अर्ज सादर केले होते. मात्र, शाळा सुरू असल्याने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त होण्यासाठी दिवाळी सुटीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. संवर्ग दोन अंतर्गत पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात येईल, जिथे दोघांच्या शाळांमधील अंतर ३० किलोमीटरपेक्षा जास्त नसेल याची काळजी घेतली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षण विभाग पुढील टप्प्यातील बदल्यांवर लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे शिक्षकांना त्यांच्या पसंतीच्या शाळांमध्ये सेवा देण्याची संधी मिळेल.

तालुकानिहाय बदली झालेले शिक्षक

मालेगाव: १०३, नाशिक ८४, दिंडोरी ७०, निफाड : ६३, सिन्नर : ४५, इगतपुरी: ३५. कळवणः ३२, देवळा ३१, चांदवड ३०, येवला २६, नांदगाव: १८, त्र्यंबकेश्वर: १८, सुरगाणा १५, पेठ: १०, बागलाण ८२, एकूण ६६२.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!