छत्रपती संभाजीनगर : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या तीन विमा पॉलिसी नूतनीकरणास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली आहे.
याप्रकरणी खंडपीठात संस्थानचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अॅडहॉक कमिटीच्या वतीने दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला होता. यात नमूद केल्यानुसार संस्थानच्या वतीने संस्थानची मालमत्ता आणि त्याचे कर्मचारी, संस्थानतर्फे चालवण्यात येणारी हॉस्पिटलची मालमत्ता आणि कर्मचारी तसेच संस्थानमध्ये येणारे भाविक यांचा अशा तीन पॉलिसी काढण्यात येतात. गतवर्षी खंडपीठाच्या परवानगीने काढण्यात आलेल्या याच तीनपैकी पहिल्या दोन विमा पॉलिसीची मुदत अनुक्रमे ९ जुलै आणि १० जुलै २०२५ रोजी संपली असून भक्तांसाठीच्या पॉलिसीची मुदत ११ ऑगस्टपर्यंत आहे.


