Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हडपसर विधानसभा मतदारसंघातील नऊ मशिनची 25 जुलैला फेरमोजणी

हडपसर विधानसभा मतदारसंघातील नऊ मशिनची 25 जुलैला फेरमोजणी

पुणे: हडपसर विधानसभा मतदारसंघातील नऊ मशिनची २५ जुलै रोजी फेरमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. त्यानुसार या मतदारसंघातील उमेदवारांना या फेरमोजणीसाठी एका प्रतिनिधीची नेमणूक करता येणार असून, त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मतदान विभागात द्यावी, असे कळविण्यात आले आहे. २५ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत या नऊ मतदान मशिनशी संबंधित व्हीव्हीपॅट मधील मतदानाची मोजणी केली जाणार आहे.

नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी फेरमोजणीसाठी तब्बल १२ लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केले होते. या मतदारसंघातील नऊ इलेक्ट्रॉनिक्स मशिनबाबत प्रशांत जगताप यांनी आक्षेप नोंदविला होता. जिल्हा निवडणूक आयोगाकडून नऊ मशिनच्या व्हीव्हीपॅटमधील मतदानाची मोजणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार ही फेरमोजणी होणार असल्याचे जगताप यांनी कळविले आहे. या फेरमोजणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून पत्र मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात जगताप यांचा सात हजार मतांनी पराभव झाला होता. या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार चेतन तुपे यांनी विजय संपादन केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!