पिंपरी : अज्ञात वाहनाने चिरडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २०) सकाळी साडेदहा वाजता अंकुश चौक, निगडी येथे घडली. संदीप देविदास नाटेकर (वय ३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात बसुराज साहेबराव नाटेकर (वय ४१, रा. मिलींदनगर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसुराज यांचे चुलतभाऊ संदीप हे रविवारी सकाळी साडेदहा वाजता निगडित अंकुश चौक येथून जात होते. दरम्यान वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या संदीप यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळाहून पसार झाला. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


