मेष: आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात जिद्दीने कार्यरत असणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. प्रगतीची नवी वाट सापडेल. उत्साही रहाणार आहात.
वृषभ : आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात आंनददायी घटना घडणार आहे. तुमचा उत्साह व उमेद वाढेल. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : आज तुमचा उत्साह वाढणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता व मरगळ आज जाईल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण करणार आहात. आनंदी व आशावादी मनाने कार्यरत राहणार आहात.
कर्क : खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी. काहींना निरुत्साही वातावरणात काम करावे लागणार आहे. आरोग्य जपावे.
सिंह : आज काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कामाचा ताण कमी असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना विविध लाभ होतील.
कन्या : सार्वजनिक क्षेत्रात आज तुम्ही उत्साहाने सहभागी होणार आहात. सर्वत्र तुमचा प्रभाव असणार आहे. काहींना मानसन्मानव प्रतिष्ठा लाभेल. तुम्ही आपल्या मतांबद्दल आग्रही राहणार आहात.
तुळ : नैराश्य कमी होईल. आज आपल्याला अनेक कामासाठी अनुकूलता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत.
वृश्चिक : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोत. आज आपल्याला काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
धनु : प्रवासातून आंनद मिळेल. आज तुम्ही विशेष उत्साही असणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आज तुम्ही स्वतःला प्राधान्य देणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : मानसिक अस्वस्थता राहील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. आपले मनोबल आज कमी असणार आहे. काहींना हितशत्रूचा त्रास जाणवेल. अनावश्यक वेळ वाया जाईल.
कुंभ : आज तुमचे वैचारिक परिवर्तन होणार आहे. मनोबल वाढणार आहे. काहींना अचानक धनलाभ होईल. प्रवासातून फायदा होईल. काहीजण जुन्या आठवणीत रमणार आहेत.
मीन: आज आपण आपल्या घरातील कामांना प्राधान्य देणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता देणारी घटना घडेल. स्वास्थ्य उत्तम लाभेल.


