पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पुण्यातील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे येथे ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. निवड झालेल्या उमदेवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी Soumya_s@diat.ac.in / soumya5.subbu@gmail.com येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 37000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://diat.ac.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे. 2 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.


