पुणे : कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यामध्ये विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
यामध्ये एकूण 33 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. 70 वर्षांपर्यंत उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहे. यामध्ये मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
मुलाखतीची तारीख काय?
मुलाखतीची तारीख २८ ऑगस्ट २०२५ असून, त्यानंतर सर्व रिक्त जागा भरेपर्यंत मुलाखती दर महिन्याच्या १४ आणि २८ तारखेला घेतल्या जातील. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.esic.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
डीन कार्यालय, ईएसआयसी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००९३.


