मुंबई : डान्सर सपना चौधरी हिच्याबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आपल्या अदाकारीने सर्वांनाच घायाळ करणारी डान्सर अशी तिची ओळख आहे. मात्र, वर्षानुवर्षे कठोर परिश्रम घेतल्यानंतर ती इंडस्ट्रीमध्ये आली. आता तिचं मोठं नाव झालं आहे. पण, सपना चौधरी जेव्हा आई झाली. तेव्हा तिचं वजन चांगलंचं वाढलं होतं. हेच वाढलेलं वजन टीकेचं कारण बनलं होतं.
सपना चौधरी ही अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, ज्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडते. सपना चौधरीने गुपचूप लग्न केले होते. त्यानंतर ती आई झाली. मात्र, याची माहिती कोणालाही समजली नाही. याची चर्चाही कुठंच झाली नाही. आता सपनाने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. सपना चौधरी हिने लग्न, गर्भधारणा आणि बाळाबद्दल उघडपणे सांगितले. सपनाने गर्भधारणेच्या वेदना सहन केल्या आहेत. तिच्या पोटाची शस्त्रक्रिया देखील झाली आहे. आई झाल्यानंतर जेव्हा तिचे वजन वाढले तेव्हा तिला खूप ट्रोल करण्यात आले होते.
लोकांना नेहमीच महिलांचे शरीर सुडौल पाहायचे असते. त्यांच्यासाठी सौंदर्य म्हणजे तंदुरुस्त शरीर. लोकांना असे वाटत नाही की, ही महिला नुकतीच आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. तिचा आदर केला पाहिजे. शरीराचा आकार म्हणजे सौंदर्य नाही. ते तुमच्या आतून येते. या सर्व गोष्टी काही काळानंतर कमी होतात. आज जे लोक मला भेटतात आणि मला पाहतात, ते 20 वर्षांनी भेटल्यावर म्हणतील का की, तू खूप सुंदर दिसतेस, असे होणार नाही. त्यामुळे सौंदर्य हेच सगळं नसतं. असे म्हणत तिने चांगलंच उत्तर दिलं.


