Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी; 75000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार…

Job News ! राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी; 75000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार…

पुणे : तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी मिळणार आहे. जर तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधीच असणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 ही असणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे येथे बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पुर्ण वेळ), पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM), दंतरोगतज्ञ, स्टाफनर्स, आरोग्य सेविका एएनएम, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (वैद्यकीय महाविद्यालये) (MO-Medical College), वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (एस.टी.एस.), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टी.बी. हेल्थ व्हिजीटर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे.

यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या 79 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारत, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आगमन-निर्गमन कक्ष येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.

महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात…

  • पदाचे नाव : बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (पुर्ण वेळ), पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM), दंतरोगतज्ञ, स्टाफनर्स, आरोग्य सेविका एएनएम, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकिय अधिकारी (वैद्यकिय महाविद्यालये) (MO-MedicalCollege), वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक (एस.टी.एस.), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, टि.बी. हेल्थ व्हिजीटर.
  • एकूण रिक्त पदे : 79 पदे.
  •  नोकरीचे ठिकाण : पिंपरी, पुणे.
  •  वेतन / मानधन : दरमहा रु. 15,500/- ते रु. 75,000/- पर्यंत.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ सप्टेंबर २०२५.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!