शरीर थकतं तेव्हा झोप लागते. झोप आपल्यासाठी पाणी आणि अन्नाइतकीच महत्त्वाची आहे. रात्री अस्वस्थता आणि इतर समस्या काही लोकांसाठी सामान्य आहे. झोपेच्या वेळीच आपले शरीर तंदुरूस्त करतं. काही सवयी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्याचे नियमित पालन करा. याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.
जर तुम्हाला झोप येत नसेल तर ३० मिनिटांनी अंथरुणातून उठा. जर तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जागे असाल तर अंथरुण सोडा. तुम्ही तुमच्या अंथरुणातून उठून दुसऱ्या खोलीत जाऊन पुस्तक वाचावे किंवा पॉडकास्ट ऐकावे. यासोबतच, एक महत्त्वाची माहिती या काळात अन्न खाऊ नका किंवा स्क्रीनकडे पाहत राहू नका. कारण ते तुमच्या मेंदूला जागे राहण्यास भाग पाडते. मन शांत करण्यासाठी ध्यान करा. जर मध्यरात्री अंथरुणावरुन उठण्याचा विचार तुम्हाला भीतीदायक वाटत असेल, तर ध्यान हा एक शक्तिशाली पर्याय आहे.
दररोज समान झोपेचे वेळापत्रक पाळा. झोपेच्या बाबतीत सातत्य म्हणजे नियमितता सर्वात महत्वाची आहे. कामाचे असो किंवा आठवड्याचे शेवटचे दिवस असो, एकाच वेळी झोपा आणि त्याच वेळी जागे व्हा. तुमच्या मेंदूला एक निश्चित वेळापत्रक हवे असते. ते नियमित राहणीमानात सर्वोत्तम काम करते. झोपण्यापूर्वी शेवटच्या तासात अंधार करा.
चांगल्या झोपेसाठी अंधार आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी शेवटच्या तासात, तुमच्या घरातील अर्धे किंवा तीन-चतुर्थांश दिवे बंद करा. हा अंधार तुम्हाला किती झोपायला लावेल हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.


