मुंबई : सेलिब्रिटींची जीवनशैली अर्थात लाईफस्टाईल म्हटलं की, चांगलीच चर्चा असते. त्यात अभिनेता अर्जुन बिजलानी हा टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. अर्जुनने अनेक हिट शो केले आहेत. यामध्ये ‘इश्क में मरजावां’, ‘परदेस में है दिल मेरा’, ‘नागिन’, ‘फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी’ यांचा समावेश आहे. लवकरच अर्जुन ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.
अर्जुन अनेकदा चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स देताना दिसतो. यावेळी त्याने चाहत्यांना त्याचे घर आतून दाखवले आहे. अर्जुनच्या घरातून मुंबईचे चांगले दृश्य दिसते. तसेच, त्याने घराचे नाव त्याची आई ‘शक्ती बिजलानी’ असे ठेवले आहे. त्याच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये डिजिटल फायरप्लेस आणि टीव्हीची भिंत आहे. एक प्रोजेक्टर आहे, ज्यावर चित्रपट किंवा तुमचा आवडता शो पाहता येतो. अर्जुनच्या घरी जेव्हा-जेव्हा पार्टी असते तेव्हा बारटेंडर येतो.
एक कस्टम मेड झुंबर, गणेश पेंटिंग, येलो सोफा आणि एक बाल्कनी आहे. बाल्कनीचा एक कोपरा आवडता असल्याचे त्याने सांगितले. कारण, ती जागा खूप मेहनत घेऊन बांधल्याचे अर्जुन याने सांगितले. अर्जुनने घरातच एक खाजगी बार बनवला आहे. लिविंग रूममध्येच बरेच पोस्टर्स आहेत.


