मुंबई : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोहिनीने आता धक्कादायक खुलासा केला आहे. दिग्दर्शक आर. के. सेल्वमणी यांच्या ‘कणमणी’ (१९९४) चित्रपटात तिच्या संमतीशिवाय तिला इंटिमेट सीन्स करण्यास सांगितले गेले होते. सुरुवातीला तिने हे सीन्स करण्यास नकार दिला होता. त्यासाठी ती रडलीही. मात्र, शूटिंग आणि निर्मिती थांबू नये म्हणून तिला होकार द्यावा लागल्याचे सांगितले.
एका मुलाखतीच्या माध्यमातून मोहिनीने ही माहिती दिली. जेव्हा तिला स्विमसूट घालून शूटिंग करण्यास सांगितले गेले, तेव्हा तिला खूप अस्वस्थ वाटले. तिच्या नकारामुळे शूटिंग अर्ध्या दिवसासाठी थांबवण्यात आले. तिला पोहायचेही येत नव्हते, ती रडली कारण तिथे महिला प्रशिक्षक नव्हती. पुरुषांनी भरलेल्या सेटवर ती अस्वस्थ झाली. दिग्दर्शक आर.के. सेल्वमणी यांनी स्विमसूट घालून एक इंटिमेट सीन प्लॅन केला होता. मी खूप नाराज झाली आणि रडण्यास नकार दिला. अर्ध्या दिवसासाठी शूटिंग थांबवण्यात आले’.
दरम्यान, मोहिनीने दिग्दर्शकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, मला पोहणेही येत नाही, मग मी इतरांसमोर अपूर्ण कपड्यांमध्ये कसे शिकू शकेन? त्यावेळी महिला प्रशिक्षक नव्हत्या. त्यामुळे माझ्यासाठी ते खूप कठीण होते. ‘उडल थाझुवा’ गाण्यासाठी चित्रित केलेला हा सीन मला करायला भाग पाडण्यात आला.


