Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bank Job ! देशातील ‘या’ प्रसिद्ध बँकेत नोकरीची मिळू शकते संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

Bank Job ! देशातील ‘या’ प्रसिद्ध बँकेत नोकरीची मिळू शकते संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, ‘इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड’ अर्थात IDBI बँक येथे काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

आयडीबीआय बँकेत प्रमुख-कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (अनुपालन)-महाव्यवस्थापक कॅडर आणि महाव्यवस्थापक-आयटी आणि एमआयएस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

20 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://idbibank.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

⇒ पदाचे नाव : प्रमुख – कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (अनुपालन) – महाव्यवस्थापक कॅडर आणि महाव्यवस्थापक – आयटी आणि एमआयएस.

⇒ एकूण रिक्त पदे : 02 पदे.

⇒ नोकरी ठिकाण : मुंबई / नवी मुंबई.

⇒ वयोमर्यादा : ४० वर्षे ते ५५ वर्षे.

⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल).

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2025.

⇒ अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : rec.experts@idbi.co.in

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!