जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत मोठा फेरबदल झाला आहे. दीर्घकाळ जगातील अव्वल अब्जाधीश असलेल्या एलॉन मस्क यांचा नंबर मागे पडला आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचे नाव म्हणून 81 वर्षीय टेक टायकून आणि ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांचे नाव पुढे आले आहे. एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीत अचानक 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे हा नवा विक्रम झाला आहे.
टेक जायंट ओरेकल कॉर्पोरेशनने त्यांचे शानदार तिमाही निकाल जाहीर केले आणि त्यानंतर जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत अचानक खळबळ उडाली. निकालांनंतर, कंपनीचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांच्या एकूण संपत्तीत १०१ अब्ज डॉलर्स (सुमारे ८.९० लाख कोटी रुपये) वाढ झाली आणि कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रमी वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, या अचानक वाढीमुळे, न्यू यॉर्कमध्ये एलिसन यांची संपत्ती ३९३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आणि यासह त्यांनी एलॉन मस्क यांना मागे टाकले आणि नंबर-१ श्रीमंत म्हणून ठरले.
यापूर्वी दीर्घकाळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती ३८५ अब्ज डॉलर्स इतकी नोंदवली गेली. आतापर्यंत एकाच दिवसात कोणत्याही अब्जाधीशांच्या संपत्तीत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.


