Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नातं टिकवणं असतं अवघड; ‘या’ गोष्टी पाळा अन् संबंध दृढ करा…

नातं टिकवणं असतं अवघड; ‘या’ गोष्टी पाळा अन् संबंध दृढ करा…

आयुष्यातील कोणतंही नातं असो मग ते पती-पत्नीचे असो वा इतर कोणतेही त्यात काळजी घेणे गरजेचे बनते. काही वेळा हीच नातं टिकवणं अवघड होतं. त्यामुळे याकडे लक्ष देणं आवश्यक असते. नातेसंबंध केवळ प्रेम, आपुलकीवर नसते तर कृतीवरही आधारित असते. नात्यात दुर्लक्ष करणेही अडचणी ठरू शकते. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.

प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती असतात. त्यात हात धरणे, मिठी मारणे किंवा हलकासा स्पर्श देखील नाते मजबूत करतो आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी एकमेकांशी बोलण्यासाठी नक्कीच वेळ काढावा. तुम्ही तुमच्या जोडीदाराला दररोज त्याच्या/तिच्या तब्येतीबद्दल विचारले पाहिजे. एक छोटेसे आभारप्रदर्शन देखील नात्यात दृढता आणू शकतात.

तुमच्या जोडीदारासाठी काही वेळ खूप महत्वाचे असतात. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ एकमेकांमध्ये घालवण्याचा प्रयत्न करावा. तुमचा जोडीदार तुम्हाला छोट्या-मोठ्या दैनंदिन कामात मदत करत असला तरीही तुम्ही त्याचे/तिचे आभार मानले पाहिजेत. यामुळे प्रेम आणि आदर दोन्ही वाढतात.

बऱ्याचदा जोडप्यांना असे वाटते की, त्यांचे नाते मजबूत आणि आनंदी करण्यासाठी महागड्या भेटवस्तू, रोमँटिक डिनर किंवा बाहेर जाणे आवश्यक असते. पण हे खरं नाही. यापेक्षा आपापसात बोलणं, वेळ वाया घालवणे हेदेखील सुखी जीवनाच्या गुरुकिल्लीपैकी एक आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून कामात मदत होत असेल तर त्याला त्या गोष्टीसाठी आभारी म्हणा, याने नात्यात दृढता निर्माण होऊ शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!