Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

CP Radhakrishnan: सीपी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

CP Radhakrishnan: सीपी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

CP Radhakrishnan Takes Oath As Vice President: सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी सकाळी10 वाजता राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळ उपस्थित होते.

जगदीप धनखर यांची शपथविधी सोहळ्याला हजेरी

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनीही या शपथविधीला उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या हजेरी लावली.

विरोधकांची उपस्थिती, राहुल गांधी अनुपस्थित

दरम्यान, यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्ष नेतेही शपथविधीला उपस्थित होते. मात्र, राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर असल्याने ते अनुपस्थित राहिले.

राज्यपालपदाचा राजीनामा

उपराष्ट्रपती निवडणुकीत 9 सप्टेंबर रोजी विजय मिळवल्यानंतर राधाकृष्णन यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडले. राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवला आहे. राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव करून उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!