तरुणांमध्ये यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे. मद्यपान करणाऱ्यांमध्येच अनेकदा ही समस्या दिसून येते. जरी फॅटी लिव्हर तसेच यकृताचा कर्करोग बहुतेकदा वृद्ध किंवा जास्त मद्यपान करणाऱ्यांमध्ये संबंधित असतो. मात्र, आता डॉक्टरांनी इशारा दिला आहे की तरुणांमध्येही हा आजार वेगाने वाढत आहे, विशेषतः जे दारू पित नाहीत त्यांच्यामध्येही आजार दिसून येतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, १९९० पासून यकृताच्या कर्करोगाचे रुग्ण दुप्पट झाले आहेत. जरी अनेक प्रकरणे व्हायरल हेपेटायटीसशी संबंधित आहेत. परंतु, सुमारे १६% असे आहेत ज्यांचे कारण अज्ञात आहे. बहुतेकदा, हे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFLD) असतात. याची प्रमुख कारणे म्हणजे बैठी जीवनशैली, चयापचय घटक, जास्त खाणे, ताणतणाव, मधुमेह आणि लठ्ठपणा. परंतु हा धोका कमी करण्याचे मार्ग आहेत.
जर तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, तर नियमित यकृत चाचण्या करा, ऍक्टिव्ह रहा, संतुलित आहार घ्या, वजन आणि रक्तातील साखर नियंत्रित करा. थकवा, अस्वस्थता किंवा सौम्य कावीळ यासारख्या सुरुवातीच्या इशाऱ्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवा. योग्यवेळी उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. यकृताचा कर्करोग मद्यपान न करणाऱ्यांनाही प्रभावित करू शकतो आणि लवकर निदान झाल्यास जीव वाचू शकतात, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. जगभरात नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) यकृताच्या नुकसानाचे एक प्रमुख कारण म्हणून उदयास आले आहे.
नॉन-फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे यकृतामध्ये जास्त चरबी जमा होणे, जे बहुतेकदा लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि बैठी जीवनशैलीमुळे होते. या फॅट्समुळे नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस (NASH) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळजळ होऊ शकते.


