मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचा क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ प्रेक्षकांना नेहमीच पसंतीचा ठरला आहे. या शोमधील ‘बिग बीं’चे अवघड प्रश्न असोत किंवा हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाची भावनिक कहाणी असो किंवा मेगास्टारची मजा असो, हा शो प्रेक्षकांचा आवडता आहे.
या शोमध्ये जेव्हा-जेव्हा अमिताभ बच्चन एखाद्या स्पर्धकाला प्रश्न विचारतात आणि तो उत्तर देऊ शकत नाही. तेव्हा प्रेक्षकही थोडे निराश होतात. अलीकडेच हॉट सीटवर बसलेल्या दिल्लीस्थित स्पर्धक मानसी शर्मासोबतही असेच घडले. जेव्हा २५ लाख जिंकल्यानंतर ती ‘बिग बी’च्या ५० लाखांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही आणि तिला शो सोडावा लागला. मात्र, आता या प्रश्नाची चर्चा सुरु झाली आहे.
बिग बी यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेल्या मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या मानसी शर्माने १३ प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. मानसीने शक्य तितक्या लवकर २५ लाख जिंकले, परंतु १४ व्या भागात येताच तिला खेळ सोडावा लागला, कारण तिला १४ व्या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते.
अमिताभ बच्चन यांनी विचारलेला १४ वा प्रश्न होता की,
‘मोजो, ज्याला ‘एमरल्डची राजधानी’ म्हटले जाते, ते कोणत्या देशात आहे?
अ) निकाराग्वा
ब) नायजेरिया
क) झिम्बाब्वे
ड) कोलंबिया
या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते पर्याय डी म्हणजेच ‘कोलंबिया’. कोलंबिया जगातील सर्वोत्तम आणि सर्वात मौल्यवान ‘पन्ना’ तयार करण्यासाठी ओळखले जाते आणि मुझो हे असे ठिकाण आहे जिथे सर्वात जास्त ‘पन्ना’ व्यवसाय होतो.


