पुणे : आपल्यापैकी अनेकांची बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल. पण, आता ही इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण, बँकांची बँक अशी ओळख असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेत मेगा भरती केली जाणार आहे. आरबीआयकडून अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी ग्रेड ‘ब’ (डीआर) – सामान्य / आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग (डीईपीआर) / सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग (डीएसआयएम) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 120 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
दरम्यान, 30 सप्टेंबर 2025. ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.rbi.org.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
⇒ पदाचे नाव : अधिकारी ग्रेड ‘ब’ (डीआर) – सामान्य / आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग (डीईपीआर) / सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग (डीएसआयएम).
⇒ एकूण रिक्त पदे : 120 पदे.
⇒ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 10 सप्टेंबर 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025.


