Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जालन्यात दोन गटांत राडा, अर्जुन खोतकरांनी एकाला मारली चापट; व्हिडिओ व्हायरल

जालन्यात दोन गटांत राडा, अर्जुन खोतकरांनी एकाला मारली चापट; व्हिडिओ व्हायरल

जालना : जालन्यात दोन गटांमध्ये भडकलेल्या हाणामारीला मध्यस्थी करताना शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी एका व्यक्तीला कानाखाली चापट मारली. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही त्या व्यक्तीला चोप दिला. ही घटना जालना शहरातील बसस्थानक परिसरात घडली असून, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे जालना शहरात खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१५ सप्टेंबर २०२५) मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी वाढले आणि जुन्या वादामुळे दोन गटांमध्ये वाद भडकला. पावसाच्या पाण्यात लाकडी साहित्य वाहून गेल्याबाबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली आणि वाहतूक कोंडीही निर्माण झाली. आमदार अर्जुन खोतकर हे पूर परिस्थितीची पाहणी करत असताना या ठिकाणी दाखल झाले आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

वाद मिटवताना एक व्यक्ती आमदारांच्या दिशेने जाब विचारत आली, तेव्हा खोतकर यांनी तिच्या थोबाड्यात चापट मारली. यानंतर खोतकर यांच्या कार्यकर्त्यांनीही त्या व्यक्तीला चोप दिला. उपस्थितांनी हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये खोतकर यांना वादग्रस्त व्यक्तीला चापट मारताना दिसत आहे, ज्यामुळे स्थानिक पातळीवर जोरदार चर्चा रंगली आहे.

घटनेच्या नंतर आमदार अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “जमावाला पांगवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मी मध्यस्थी केली. एकाला हटवण्यासाठी मला चापट मारावी लागली.” त्यांनी जमावाला शांत राहण्यास सांगितले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. खोतकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून एनडीआरएफची मदत मागितली असून, नुकसानग्रस्तांसाठी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!