Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ब्रेकिंग..! पुण्यात गोळीबाराचा थरार; घायवळ टोळीचा मध्यरात्री हल्ला, शहर पुन्हा हादरलं

ब्रेकिंग..! पुण्यात गोळीबाराचा थरार; घायवळ टोळीचा मध्यरात्री हल्ला, शहर पुन्हा हादरलं

पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमुळे शहरवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असताना, बुधवारी (१७ सप्टेंबर) मध्यरात्री कोथरूड भागात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार घडला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या टोळीकडून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच नाना पेठेत आंदेकर टोळीने आयुष कोमकरवर केलेल्या गोळीबारात तरुणाची हत्या झाली होती. आता घायवळ टोळीचा हा हल्ला शहरातील टोळीविरोधी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

साईड न दिल्याने संतापून गोळीबार

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात ही घटना घडली. घायवळ टोळीचे गुंड मुसा शेख, रोहित आखाड आणि मयूर कुंभारे हे तिघे एका गाडीतून परिसरातून जात होते. यावेळी एका वाहनचालकाने त्यांच्या गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याने हे तिघे संतापले.

या किरकोळ वादातून त्यांनी कारमधील प्रकाश धुमाळ (वय अज्ञात) नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला. सुरुवातीला तीन राऊंड फायरिंग झाल्याची चर्चा होती, मात्र पोलिस सूत्रांनुसार एकच राऊंड फायर झाला. या हल्ल्यात प्रकाश धुमाळ यांच्या पायाला गोळी लागली असून, ते जखमी झाले. त्यांना तात्काळ पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली असली, तरी पूर्ण तपशील अद्याप समोर आला नाही.

या घटनेमुळे कोथरूड परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर कोथरूड पोलिस स्टेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींच्या शोधात पथक सतर्क केले आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपास हाती घेतला आहे.

आयुष कोमकर खूनानंतर घायवळ टोळीचा हल्ला

ही घटना पुण्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रवाहाचे द्योतक आहे. काही दिवसांपूर्वी नाना पेठेत आंदेकर टोळीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (१९) यावर पाळत ठेवून हल्ला केला होता. हल्लेखोरांनी तब्बल १२ गोळ्या झाडल्या, त्यातील नऊ आयुषला लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर खून आणि मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आयुषच्या खुनानंतर कृष्णा आंदेकरने स्वतःहून समर्थ पोलिस स्टेशनला हजर होऊन कबुली दिली होती की, त्यानेच मारेकऱ्यांना पिस्तूल पुरवले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!