पुणे : पुण्यातील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. एका रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 30 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था येथे अर्धवेळ विद्यार्थी सल्लागार या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
⇒ पदाचे नाव : अर्धवेळ विद्यार्थी सल्लागार.
⇒ एकूण रिक्त पदे : 01 पदे
⇒ नोकरीचे ठिकाण : पुणे.
⇒ निवड प्रक्रिया : मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख : 30 सप्टेंबर 2025.
⇒ मुलाखतीची पत्ता : भरती कक्ष, तळमजला, मुख्य इमारत, डीआयएटी (डीयू), पुणे
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://diat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


