Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला फरार; पासपोर्ट मिळाला कसा? पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला फरार; पासपोर्ट मिळाला कसा? पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह

Pune Crime: पुणे पोलीस गुंडांवर कारवाई करत असताना शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ मात्र लंडनमध्ये ऐशआरामात राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोथरुडमधील गोळीबार प्रकरणानंतर त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा (मकोका) लावण्यात आला आहे. परंतु, हत्या, खंडणी, अपहरण आणि मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या घायवळला पासपोर्ट कसा मिळाला, याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलेश घायवळसह 10 जणांवर मकोकांतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात मयूर गुलाब कुंबरेसह काही जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपी फरार आहेत. घायवळविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून तो भारतात परतल्यास त्वरित अटक केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Nilesh Ghaywal Gang : कोथरूडमध्ये रस्त्यावर गोळीबार अन् कोयता हल्ला, निलेश घायवळ गँगचा धुमाकूळ; टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, घायवळने आपल्या गुन्हेगारी कृत्यांमधून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातून लंडनमध्ये घर विकत घेतले आहे. त्याचा मुलगाही सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. कोथरुडमधील गोळीबाराची घटना 17 सप्टेंबर रोजी घडली होती. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून प्रकाश मधुकर धुमाळ (वय 36) या तरुणावर गोळीबार करण्यात आला होता.

हेही वाचा – ब्रेकिंग..! पुण्यात गोळीबाराचा थरार; घायवळ टोळीचा मध्यरात्री हल्ला, शहर पुन्हा हादरलं

त्यानंतर घायवळ टोळीने आणखी एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते. या घटनांनंतर गुंडगिरी करणाऱ्या घायवळ टोळीच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, टोळीचा म्होरक्या लंडनमध्ये मोकाट फिरतोय ही बाब पुणे पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!