महाराष्ट्र जागरण डेस्क: मेरी कॉम, सरबजित यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे निर्माते संदीप सिंह यांच्या आगामी चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यामागचं कारण म्हणजे “द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज’ असं या चित्रपटाचे नाव असून, त्याचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
या पोस्टरमध्ये प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता ‘कांतारा’ फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेता ऋषभ शेट्टी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसून येत आहे. या चित्रपटाविषयी ऋषभ म्हणाला, ‘द प्राइड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटाची संदीप यांची कल्पना इतकी भव्य होती की, मी कथा ऐकताच त्याला होकार दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी शब्दांपलीकडचा सन्मान आहे. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.


