Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Daily Horoscope: धनु राशींच्या लोकांना दुपारनंतर होऊ शकतो धनलाभ; इतर राशींचे काय? वाचा सविस्तर

Daily Horoscope: धनु राशींच्या लोकांना दुपारनंतर होऊ शकतो धनलाभ; इतर राशींचे काय? वाचा सविस्तर

मेष: दुपारनंतर विशेष आनंदी राहाल. व्यवसायातील आर्थिक कमाई उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता दुपारनंतर संपणार आहे. कामाचा ताण कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होतील, उत्साही राहाल. प्रवास सुखकर होतील.

मिथुन: प्रवासात काळजी घ्यावी लागणार आहे. दुपारनंतर मनोबल कमी राहील, हितशत्रूवर मात करू शकणार आहात, दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत.

कर्क: दुपारनंतर कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी राहणार आहात. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.

सिंह : काहींचा वेळ व पैसा अनावश्यक कामात खर्च होणार आहे. कामाचे नियोजन चुकणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी.

कन्या: बौद्धिक कामगिरी उत्तम होईल. कामे यशस्वी होणार आहेत. दुपारनंतर आनंदी राहाल. आर्थिक नियोजन योग्य ठरेल.

तुळ: मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.

वृश्चिक: जिद्दीने कार्यरत राहणार आहात. तुमच्यामध्ये असणारी चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील, एखादी नवी सुसंधी लाभेल, मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

धनुः आर्थिक कामास अनुकूलता प्राप्त होईल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील, आनंदी व आशावादी राहाल.

मकर: गेले दोन दिवस रखडलेल्या कामात आज सुयश लाभेल. दुपारनंतर मानसिक उद्विग्नता संपेल. कामाचा ताण कमी होईल, प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल.

कुंभ : दुपारनंतर दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणी जाणवतील. मानसिक त्रास होईल. एखादा मनस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रूवर मात कराल.

मीन: आनंदी राहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर प्रियजन भेटतील, प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. संततीसौख्य लाभेल, मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!