Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आंदेकर टोळीचे नवे कारस्थान उघड! व्यावसायिकाकडून दीड कोटींची खंडणी उकळली

आंदेकर टोळीचे नवे कारस्थान उघड! व्यावसायिकाकडून दीड कोटींची खंडणी उकळली

Pune Crime Newe: पुणे पोलिसांनी कुख्यात आंदेकर टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मोठे पावले उचलली आहेत. समर्थ पोलीस ठाण्यात या टोळीविरोधात अधिक दोन गुन्हे दाखल केले गेले आहेत, ज्यात अनधिकृत बांधकाम आणि खंडणी मागणे यासारखी गंभीर तक्रारी समाविष्ट आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 2017 पासून आंदेकर टोळीने एका व्यावसायिकाकडून सतत त्रास देत दीड कोटी रुपयांची खंडणी उकळली होती. व्यवसायात अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच टोळीकडून ‘प्रोटेक्शन’ मिळावे, या कारणावरून ही रक्कम मागण्यात आली होती. मुंबईतील ऐंशी-नव्वदच्या दशकातील अंडरवर्ल्ड टोळ्यांच्या प्रोटेक्शन मनीप्रमाणेच 2017 ते 2025 पर्यंत आंदेकर टोळीकडून हा प्रकार सुरू होता.

दरम्यान, याआधी बंडू आंदेकरसह 20 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई झाली आहे. मात्र नव्या तक्रारी आणि पुराव्यांनंतर पोलिसांनी आणखी दोन गुन्हे दाखल केले. शहरातील बांधकाम व्यवसाय, स्थानिक व्यावसायिक आणि नागरी भागांमध्ये टोळीने बेकायदेशीर दबदबा निर्माण केला होता. खंडणीसाठी दडपशाही, धमक्या आणि अनधिकृत बांधकामांमुळे नागरिक त्रस्त झाले होते.

हेही वाचा – मोठी बातमी! आयुष कोमकर हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंदेकर पोलिसांच्या ताब्यात

गणेश पेठेत बुलडोझर कारवाई

पुण्यातील गणेश पेठेत बंडू आंदेकर यांनी अवैध मार्गाने पैसे जमवून केलेले अनधिकृत बांधकाम आज पोलिसांनी जमीनदोस्त केले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी स्पष्ट केले की ही कारवाई करून गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडणे हा उद्देश होता. तथापी, आयुष गणेश कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकर यांच्या घरासमोरील आणि आसपासचे अनधिकृत घर, पत्रा शेड, शौचालय पुणे महानगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!