Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

October Weather Forecast: मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात! ऑक्टोबर महिन्यात कसे राहणार वातावरण, IMD चा अंदाज काय सांगतो? पहा

October Weather Forecast: मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात! ऑक्टोबर महिन्यात कसे राहणार वातावरण, IMD चा अंदाज काय सांगतो? पहा

October Weather Forecast: राज्यात मान्सूनच्या (monsoon) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.आता फक्त ऑक्टोबर महिन्यात पाऊस राहील असे हवामान खात्याकडून सांगितलं जात आहे.यंदा सरासरीपेक्षा अति पाऊस झाला आहे. त्याशिवाय,ऑक्टोबरंहिन्यात थंडीदेखील जास्त राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात हवामान विभागाच्या म्हणण्यांनुसार काही ठिकाणी अवकाळी पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र पाऊस असला तरीसुद्धा त्यासोबत उकाडा जाणऊ शकतो. रात्री तापमान वाढ जास्त होऊ शकते. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्यामुळे फटाके फोडले जातात, परिणामी तापमान वाढ आणि प्रदूषण यामुळे हवामान अधिक खराब होईल.

महाराष्ट्रात कसं असणार तापमान?
राज्यात पाऊस आणि उष्णता असं एकत्र अमुभवायला मिळेल. रात्री उकाडा वाढू शकतो. घामाच्या धारा लागण्याची शक्यता आहे. दमट उष्ण हवामान यामुळे ऑक्टोबर हैराण करू शकतो. महाराष्ट्रात 10 ऑक्टोबरपर्यंत कमी अधिक अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कुठे असणार पाऊस?
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई आणि कोकणात हलक्या सरी बरसतील. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत 5 ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. यंदा दसऱ्यालाही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागपूरसह विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

कुठे राहणार जास्त तापमान?
नुकत्याच जारी केलेल्या अंदाजानुसार देशाच्या अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय, पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश भागात पुन्हा एकदा पाऊस होईल. पावसाशिवाय मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होईल त्यामुळे उकाडा वाढेल.याला अपवाद म्हणून ईशान्य आणि संलग्न पूर्व भारत, पश्चिम हिमालयीन राज्ये आणि सौराष्ट्र व कच्छ इथे सर्वात जास्त तापमान राहू शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!