मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कपूर लवकरच बाळाला जन्म देणार आहे. सोनम कपूर ही दुसऱ्यांदा आई होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोनम कपूरकडून लवकरच केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या गुड न्यूजमुळे कपूर आणि आहुजा या दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा लग्नाच्या सात वर्षांनंतर दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. सोनम आणि आनंद त्यांच्या दुसऱ्या बाळाची आता वाट पाहत आहेत. कपूर आणि आहुजा कुटुंबे आनंदाने भरलेली आहेत. दोन्ही कुटुंबे त्यांच्या नवीन बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनमने अद्याप तिच्या गरोदरपणाबद्दल कोणतेही संकेत दिले नसले तरी, ती लवकरच अधिकृत पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी सांगू शकते.
सोनम आणि आनंदच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांना इंडस्ट्रीमधील एक ‘पॉवर कपल’ मानले जाते. त्यांचे प्रेम आणि केमिस्ट्री अतुलनीय आहे. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर, सोनम आणि आनंद यांनी २०१८ मध्ये लग्न केले. सोनम आणि आनंदच्या लग्नाला अनेक प्रमुख बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.
2022 मध्ये पहिल्यांदा झाले आई-बाबा
लग्नाच्या चार वर्षांनी २०२२ मध्ये या जोडप्याला मुलगा झाला. वायू असे त्याचे नाव आहे. आई झाल्यापासून सोनम अनेकदा तिच्या काही अपडेट्स शेअर करताना दिसून येते. सोनम तिच्या मुलासोबतच्या पोस्ट व्हायरल होतात.


