पुणे: व्हॉट्सअॅपवर चॅटिंगदरम्यान अनेकदा काही युजर्सना अक्षरांचा आकार कमी वाटतो आणि पाहण्यासाठी फोन डोळ्याजवळ घ्यावा लागतो. अशावेळी व्हॉट्सअॅपवर अक्षरांची साईज मॅनेज करण्याची सुविधा मिळते. चॅट सेटिंगमधून फॉण्ट साइज मॅनेज करता ता येते.
मेटाचा लोकप्रिय चॅटिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर कोट्यवधी लोक करतात, म्हणूनच हे भारतातील सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर सर्व वयोगटातील युजर आहेत. म्हणून कंपनी आपल्या वेगवेगळ्या युजरच्या गरजा लक्षात घेऊन फीचरमध्ये बदल करत असते. व्हॉट्सअॅपवर चॅटिंगदरम्यान अनेकदा काही युजर्सना अक्षरांचा आकार कमी वाटतो. खासकरून वयस्कर व्यक्तींना छोटी अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत. अशावेळीव्हॉट्सअॅपवर अक्षरांचा आकार मॅनेज करण्याची सेटिंग देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅपवर फॉण्ट साइज करता येईल मॅनेज
व्हॉट्सअॅपवर फॉण्ट साइज मॅनेज करता येते. व्हॉट्सअॅपचा वापर करताना तुम्हाला अॅपवरील अक्षरे जास्तच छोटी वाटत असतील तर लार्ज फॉण्टची निवड करता येईल. फॉण्ट साइज व्हॉट्सअॅपवर चॅट सेटिंग मधून बदलता येते. फॉण्ट साइज बदलण्यासाठी पुढील प्रोसेस फॉलो करा :
- सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करा.
- त्यानंतर टॉप राइट कॉर्नरवरील मेन्यू ऑप्शनवर टॅप करा.
- त्यानंतर सेटिंग्सवर टॅप करा.
- त्यानंतर चाटवर टॅप करा.
- मग फॉण्ट साइजवर टॅप करा.
- तिथे स्माल, मीडियम आणि लार्ज असे ऑप्शन मिळतील.
- यातून मीडियम किंवा लार्ज ऑप्शनची निवड करा.
व्हॉट्सअॅपवर फॉण्ट साईजच्या या सेटिंगचा वापर तुम्ही तुमच्या आई-बाबांसाठी करू शकता किंवा डोळ्यांना जास्त त्रास नको असेल तर स्वतःसाठी देखील वापरू शकता. घरातील वयस्कर लोक जर व्हॉट्सअॅपचा वापर करत असतील आणि त्यांना छोटी अक्षरे पाहण्यासाठी त्रास होत असेल तर फॉण्ट साइज अॅडजस्ट करता येईल.
फोन नंबरविना पाठवता येतील मेसेज
व्हॉट्सअॅप सध्या युजरनेम फीचरवर काम करत आहे ज्यामुळे फोन नंबरची प्रायव्हसी वाढेल. हे फीचर आल्यावर व्हॉट्सअॅपपवर तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी वुजरनेम आवश्यक असेल. त्यामुळे फोन नंबर शेअर करण्याची गरज राहणार नाही. हे फीचर अनोळखी लोकांशी चॅटिंग करताना खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला फोन नंबर न देता चॅटिंग करता येईल.


