Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पॉवर बटन खराब झालं तर काय करायचं? ही ट्रिक येईल कामी

पॉवर बटन खराब झालं तर काय करायचं? ही ट्रिक येईल कामी

मुंबई: पॉवर बटन बंद पडले आहे? तर पुढील ट्रिक वापरून तुम्ही फोनची स्क्रीन ऑन करू शकता. चला जाणून घेऊया या समस्येवरील जालीम उपाय. हल्ली स्मार्टफोनशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. एकेकाळी संवादाचे साधन असलेल्या स्मार्टफोन्सशिवाय आयुष्यातील अनेक व्यवहार ठप्प पडू शकतात. त्यामुळे चोवीस तास स्मार्टफोन आपल्या हातात असतो, तरीही यातील अनेक फीचर आपल्याला माहीत नसतात. अशाच एका सिक्रेट अँड्रॉइड फीचरची माहिती आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलच्या माध्यमातून देणार आहोत. स्मार्टफोनवर एखादे काम करायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला फोन ऑन करावा लागतो. फोन अनलॉक करण्यासाठी अनेक जण पावर बटन प्रेस करतात, त्यामुळे स्क्रीन ऑन होते आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फोन लॉक पिन व पॅटर्नच्या माध्यमातून ओपन करता.

परंतु जर एखाद्या दिवशी स्मार्टफोनचं पावर बटनच बिघडलं, तर काय होईल ? याचा विचार केलाय का कधी? तेव्हा तुम्ही फोन अनलॉक कसा कराल. फोन अनलॉक करण्यासाठी पिन व पॅटर्न टाकावा लागतो, परंतु जर स्क्रीन ऑनच झाली नाही, तर तुम्ही ना पिन टाकू शकाल, ना पॅटर्न, पावर बटनव्यतिरिक्त देखील स्क्रीन ऑन करण्याच्या अनेक पद्धती आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑन कराव्या लागतील. बहुतांश लोकांना या सिक्रेट सेटिंगची माहिती नसते, परंतु आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.

पावर बटनविना स्क्रीन ऑन कशी करायची:

  • सर्वप्रथम स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जा.
  • त्यानंतर लॉक स्क्रीन & वॉलपेपरच्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • इथे स्मार्ट स्क्रीन ऑन/ऑफ ऑप्शनवर जा.
  • त्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील, ज्यात तुम्हाला डबल टॅप यू टर्न ऑफ ऑप्शनवर क्लिक करा.
  • या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या फोनमध्ये एक नवीन फीचर ऑन होईल. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही पावर बटनविना देखील स्मार्टफोन स्क्रीन ऑन करू शकता.

यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर डबल टॅप करावे लागेल. म्हणजे तुमच्या फोनची स्क्रीन ऑन होईल आणि तुम्ही फोन अनलॉक करण्यासाठी पिन टाकू शकाल. काही फोन्समध्ये लिफ्ट टू वेक अप हा पर्याय असतो, तोदेखील उपयुक्त ठरतो. ज्यात फोन उचलल्यावर स्क्रीन आपोआप ऑन होते आणि लॉक स्क्रीन समोर येते. महत्त्वाची बाब म्हणजे हे पर्याय पॉवर बटन बंद होण्यापूर्वी अॅक्टिव्हेट करावे लागतात म्हणजे ऐनवेळी कामी येतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!