Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

घाई करू नका ! सेकंड हँड आयफोन घेताना या ५ गोष्टी पडताळून पाहा…

घाई करू नका ! सेकंड हँड आयफोन घेताना या ५ गोष्टी पडताळून पाहा…

पुणे: आयफोन घेण्याचं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. तरुण मंडळीमध्ये आयफोन घेण्याची मोठी क्रेझ आहे. अगदी बाजारात चांगले फिचर्स देणारे मोबाईल असले, तरी आयफोन घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतंच, तरुण मंडळी यासाठी थोडेथोडे पैसे जमवतात, पण, सध्या बाजारात बघायला गेलं तर आयफोनच्या किमती देखील अधिक आहेत, त्यामुळे सेकड हँड आयफोन घेण्याचाही लोक विचार करतात. मात्र सेकंड हँड आयफोन घेताना तुम्हाला काही गोष्टी पडताळू पाहायला हव्यात. त्याची यादी आम्ही देत आहोत.

हल्ली इतके स्मार्टफोन बाजारात आले, आहेत की, कोणता घ्यावा हेच कळत नाही. त्यात तरुण मंडळींना अॅप्पल कंपनीचा आयफोनच घ्यायचा असतो. त्यासाठी मुलं थोडेथोडे करून पैसे देखील जमा करतात. पण बाजारात जाऊन या दिग्गज कंपनीच्या मोबाईलच्या किमती पाहिल्यास खूपच जास्त वाटतात. त्यातही आयफोनचे प्रो मॉडेल्स महाग असल्यानं बहुतांश ग्राहकांच्या ते आवाक्याबाहेर देखील असतात. अशा वेळी तुमच्या समोर सेकंड हँड आयफोन घेण्याचाच पर्याय उरतो. स्वस्त आणि आपल्या बजेटमध्ये सेकंड हँड आयफोन मिळत असेल तर विकत घ्यायला काहीही हरकत नाही. फक्त आम्ही खाली दिलेल्या ५ गोष्टी पडताळल्यास तुम्हाला सेकंड हँड आयफोन विकत घेताना कसलाही तोटा होणार नाही. चला तर जाणून घ्या…

फोनचा आयएमईआय नंबर तपासा
सेकंड हँड मोबाईल घेत असल्यानं हा मोबाईल तपासून पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अॅपल कंपनीच्या वेबसाईटवर जावं लागेल. तुम्ही वेबसाईटवर गेले की तुम्हाला आयएमईआय त्याठिकाणी टाकावा लागेल. यावेळी तुम्हाला हा मोबाईल अॅप्पल कंपनीचाच असहे की नाही, हे पडताळून पाहता येईल. इतकी महागडी वस्तू विकत घेताना ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. तुम्ही अॅपल कंपनीचा आयफोन खरेदी करताना त्याचा सिरियल नंबर तपासून पाहू शकतात.

बॅटरी लाईफ तपासा

सेकंड हँड आयफोन घेताना सर्वात आधी त्याची बॅटरी लाईफ तपासणं गरजेचं आहे. कारण खूप जुना मोबाईल असेल तर त्याचा परिणाम बॅटरी लाईफवर होतो. त्यामुळे आयफोनची बॅटरी लवकर उतरू शकते. बॅटरी लाईफ तपासण्यासाठी तुम्हाला आयफोनच्या सेटिंगमध्ये जावं लागेल, जर बॅटरी लाईफ ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तरच तुम्ही सेकंड हँड आयफोन खरेदी करू शकता.

मोबाईल तपासा

सेकंड हँड मोबाईल घेताना तुम्हाला त्या मोबाईलच्या सर्व गोष्टी तपासून घेणं गरजेचं आहे. त्याच्या बटनापासून ते कॅमेरा आणि फेस आयडीपर्यंत सगळ्या गोष्टी तपासून घ्या. मोबाईलची बॉडी आणि त्याच्या डिस्लेवर जर स्क्रैचेस असेल तर तुम्ही त्यांना मोबाईलची किंमत कमी करण्याचं म्हणू शकतात.

बॅटरी, डिस्प्ले बदलला तर नाही ना?

सेकंड हँड मोबाईल घेतानाच तपासून घ्या की, त्या मोबाईलची बॅटरी किंवा डिस्प्ले बदललेला तर नाही ना, बॅटरी बदलली असल्यास तुम्हाला सेटिंगमध्ये बॅटरी लाइफ लेव्हल दिसणार नाही, तसंच बर्ड-पार्टी डिस्प्लेमध्ये टू टोन फिचर चांगलं काम करणार नाही. यामुळे अशा प्रकारच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते. मोबाईलसोबत काय मिळणार?

आधी आयफोन खरेदी केला की त्यासोबत इअरफोनसह चार्जर मिळत होता. त्यामुळे तुम्हाला सेकंड हँड मोबाईल खरेदी करताना मोबाईलसोबत चार्जर, इअरफोन आहेत का, हे देखील विचारा. वरील गोष्टी पडताळून पाहिल्यास तुम्हाला सेकंड हँड आयफोन खरेदी करताना तोटा होण्याची शक्यता कमी असते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!