Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

व्हॉट्सअ‍ॅपवर छोटी अक्षरे दिसत नाहीत? असा वाढवा फॉण्टचा आकार

व्हॉट्सअ‍ॅपवर छोटी अक्षरे दिसत नाहीत? असा वाढवा फॉण्टचा आकार

पुणे: व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंगदरम्यान अनेकदा काही युजर्सना अक्षरांचा आकार कमी वाटतो आणि पाहण्यासाठी फोन डोळ्याजवळ घ्यावा लागतो. अशावेळी व्हॉट्सअ‍ॅपवर अक्षरांची साईज मॅनेज करण्याची सुविधा मिळते. चॅट सेटिंगमधून फॉण्ट साइज मॅनेज करता ता येते.

मेटाचा लोकप्रिय चॅटिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर कोट्यवधी लोक करतात, म्हणूनच हे भारतातील सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर सर्व वयोगटातील युजर आहेत. म्हणून कंपनी आपल्या वेगवेगळ्या युजरच्या गरजा लक्षात घेऊन फीचरमध्ये बदल करत असते. व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंगदरम्यान अनेकदा काही युजर्सना अक्षरांचा आकार कमी वाटतो. खासकरून वयस्कर व्यक्तींना छोटी अक्षरे स्पष्ट दिसत नाहीत. अशावेळीव्हॉट्सअ‍ॅपवर अक्षरांचा आकार मॅनेज करण्याची सेटिंग देण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर फॉण्ट साइज करता येईल मॅनेज

व्हॉट्सअ‍ॅपवर फॉण्ट साइज मॅनेज करता येते. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करताना तुम्हाला अ‍ॅपवरील अक्षरे जास्तच छोटी वाटत असतील तर लार्ज फॉण्टची निवड करता येईल. फॉण्ट साइज व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट सेटिंग मधून बदलता येते. फॉण्ट साइज बदलण्यासाठी पुढील प्रोसेस फॉलो करा :

  •  सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • त्यानंतर टॉप राइट कॉर्नरवरील मेन्यू ऑप्शनवर टॅप करा.
  • त्यानंतर सेटिंग्सवर टॅप करा.
  • त्यानंतर चाटवर टॅप करा.
  • मग फॉण्ट साइजवर टॅप करा.
  • तिथे स्माल, मीडियम आणि लार्ज असे ऑप्शन मिळतील.
  • यातून मीडियम किंवा लार्ज ऑप्शनची निवड करा.

व्हॉट्सअ‍ॅपवर फॉण्ट साईजच्या या सेटिंगचा वापर तुम्ही तुमच्या आई-बाबांसाठी करू शकता किंवा डोळ्यांना जास्त त्रास नको असेल तर स्वतःसाठी देखील वापरू शकता. घरातील वयस्कर लोक जर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असतील आणि त्यांना छोटी अक्षरे पाहण्यासाठी त्रास होत असेल तर फॉण्ट साइज अ‍ॅडजस्ट करता येईल.

फोन नंबरविना पाठवता येतील मेसेज

व्हॉट्सअ‍ॅप सध्या युजरनेम फीचरवर काम करत आहे ज्यामुळे फोन नंबरची प्रायव्हसी वाढेल. हे फीचर आल्यावर व्हॉट्सअ‍ॅपपवर तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी वुजरनेम आवश्यक असेल. त्यामुळे फोन नंबर शेअर करण्याची गरज राहणार नाही. हे फीचर अनोळखी लोकांशी चॅटिंग करताना खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला फोन नंबर न देता चॅटिंग करता येईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!